बारामतीमध्ये खळबळ; श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये धडकले पोलीस, नेमकं काय घडलं?

Baramati Constituency Ajit Pawar vs Yugendra Pawar

Baramati Constituency | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस अगोदरच अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. कालरात्री शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यात देशमुख यांच्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागला आहे. तर, काही ठिकाणी उमेदवारांवरदेखील अज्ञात व्यक्तींकडून हल्ले करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या. अशात बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Baramati Constituency)

लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे थेट काका अजित पवार यांच्याविरोधात उभे राहिले आहेत. युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. या निवडणुकीत पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार देखील प्रचारात उतरल्याचे दिसून आले.

शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन

शरद पवारांनी अजितदादांविरोधात तरुण उमेदवार दिला आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर जोरदार निशाणा साधताना दिसून येत आहेत. त्यातच कालरात्री बारामतीमध्ये एक मोठी घटना घडली. श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये काल रात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवल्याची माहिती समोर आली आहे. (Baramati Constituency)

श्रीनिवास पवार यंच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी चौकशी केली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी ही चौकशी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही चौकशी का करण्यात आली, त्यातून काय माहिती समोर आली याबाबत पोलिसांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाल्याने बारामतीत सध्या याचीच चर्चा रंगली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

युगेंद्र पवार vs अजित पवार

या सर्च ऑपरेशनबाबत युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरयू मोटर्स मध्ये चौकशी केली असता काही सापडलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मतदानाच्या एक दिवस अगोदर या घडामोडी झाल्याने बारामतीमध्ये सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर आता श्रीनिवास पवार काय प्रतिक्रिया देणार, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Baramati Constituency)

News Title – Baramati Constituency Ajit Pawar vs Yugendra Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

मतदान कार्ड हरवलंय? तर या ओळखपत्रांआधारे करता येणार मतदान

निवडणुकीत उतरलेल्या 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार भाजपात?

प्रचारसभा थंड होताच ‘खिशे’ झाले गरम, कोकणात मध्यरात्री पडला पैशांचा पाऊस?

अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे स्टंटबाजी, भाजपने ‘ते’ आरोप फेटाळले

अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांकडून ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा?, नेमकं काय घडलं?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .