Baramati Loksabha 2024 | बारामती लोकसभा (Baramati Loksabha 2024) मतदारसंघाकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. मोठा ट्विस्ट या बारामती लोकसभा (Baramati Loksabha 2024) निवडणुकीत पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या एकमेकांविरोधात लढणार आहेत. मात्र आता दोन्ही उमेदवारांच्या डोक्यावर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंच्या खर्चात तफावत
दोन्ही उमेदवारांनी खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा करण्यास सांगितलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या खर्चात 1 लाख 3 हजार रूपयांची तफावत पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूने सुनेत्रा पवार यांना 9 लाख 10 हजार रूपयांचा फरक आढळून आला. (Baramati Loksabha 2024)
यामुळे दोन्ही उमेदवारांनी 48 तासांत खुलासा करावा, नाहीतर दोघांच्या उमेदवारी अर्जामध्ये तफावत समाविष्ट केली जाईल, असं त्या नोटीसमध्ये लिहिलं आहे. जर उमेदवारांना आक्षेप असेल तर जिल्हा निवडणूक निरीक्षक समितीकडे दाद मागण्याचा अधिकार उमेदवारांना आहे. (Baramati Loksabha 2024)
बारामती मतदारसंघातील 38 उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील बुधवारी तपासण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी 28 एप्रिलचा खर्च 29 लाख 93 हजार 31 रूपये सादर केला आहे. या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्याने शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यास 9 लाख 10 हजार 901 रूपये तफावतता आढळली. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आलीये.
“48 तासांत खुलासा करा”
सुप्रिया सुळे यांनी 28 एप्रिलपर्यंत 37 लाख 23 हजार 610 रुपये खर्च केले आहे. खर्चाशी तुलना केल्यानंतर 1 लाख 3 हजार 449 रूपयांची तफावतता आली. दोन्ही उमेदवारांनी नोटीसचे उत्तर 48 तासात द्यावं अशी नोटीस बजावली आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातून जोरदार प्रचार सुरू आहे. अजित पवार यांच्या सभेला देखील गर्दी होताना दिसत आहे. शरद पवार देखील गावोगावी जात आपल्या चिन्हा विषयी माहिती देत आहेत. येत्या 7 मे रोजी बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे पाहणं गरजेचं आहे.
News Title – Baramati Loksabha 2024 Candidate Supriya Sule And Sunetra Pawar Election Commission Notice
महत्त्वाच्या बातम्या
मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…
काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार
धक्कादायक… ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला
या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता
विखेंच्या कार्यकर्त्यांनी खोटा संदेश सोशल मीडियात व्हायरल केला, अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात!