बारामतीत कोण मारणार बाजी?; मतमोजणीआधीच ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Baramati Loksabha 2024 | बारामती लोकसभा मतदार संघ राज्यात सर्वाधिक चर्चेतला मतदार संघ राहिला आहे. येथे प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. बारामतीमध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना होतोय.

अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानापर्यंत येथे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आमदार रोहित पवार यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी येथे पैसे वाटण्यात आल्याचा आरोप केला होता. यामुळे तेव्हा एकच खळबळ उडाली होती.

“बारामतीत सुनेत्रा पवारच जिणूक येणार”

बारामती हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उद्या 4 जूनरोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठा दावा करण्यात आला आहे.

बहुतांश एक्झिट पोल्सनी सुप्रिया सुळे बाजी मारणार असं म्हटलय. पण बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना कुठे लीड मिळू शकतो?, किती हजारांचा लीड मिळू शकतो, याबद्दल मोठा दावा (Baramati Loksabha 2024 ) करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच विजयी होणार, असा दावा केलाय.

“सुनेत्रा पवारांना 50 हजारपेक्षा जास्त लीड मिळेल”

सुनेत्रा पवार 1 लाख मतांनी विजयी होतील, असं संभाजी होळकर यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार यांना बारामती तालुक्यात मोठी आघाडी मिळेल. इंदापूर, दौड, खडकवासला इथे लीड मिळेल. त्याच पद्धतीने पुरंदर, भोर विधानसभा मतदारसंघातही लीड मिळेल, असा दावाच होळकर यांनी केलाय.

सुनेत्रा पवार यांना बारामतीमध्ये 50 हजारपेक्षा जास्त लीड मिळेल असा संभाजी होळकर यांना विश्वास आहे. अजित पवार या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत विकासाच्या मुद्यावर बोलले.त्यांनी (Baramati Loksabha 2024 ) याच्या जोरावरच मत मागितले, असंही यावेळी संभाजी होळकर म्हणाले. आता बारामतीमध्ये कोण बाजी मारणार हे उद्या स्पष्ट होईलच.

News Title :  Baramati Loksabha 2024 Result

महत्वाच्या बातम्या- 

खरचं रविना टंडनने मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केली? यासंदर्भात रवीना काय म्हणाली

उष्णतेपासून दिलासा मिळणार! हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

आयफोनला टक्कर देण्यासाठी रियलमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

…म्हणून जालन्यात महाविकास आघाडी बाजी मारणार?