मुख्यमंत्र्यांची ‘पॉवर’फुल खेळी, सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी

पुणे |  बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी मिळाली आहे.

भाजपने यंदा महादेव जानकर यांचा पत्ता कट करून कांचन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून आघाडीवर होतं.

सुप्रिया सुळेंना ज्या दौंड विधानसभा मतदारसंघातून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला होता. त्याच दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला निवडणुकीत उतरवून भाजपने सुळेंना शह दिला आहे.

पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच बारामती जिंकून दाखवू, असं म्हणणाऱ्या नेत्यांना सोडून कांचन कुल यांना मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी दिली आहे. त्या नेमका काय करिश्मा दाखवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…

उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले

माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा

काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल