Baramati | संपूर्ण देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात सुरु असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कायमच हा सण सर्वजण मोठ्या जल्लोषात आणि एकत्रीत साजरा करत असतात. राजकारणातील मंत्री, नेते मंडळी यांच्या घरी देखील दिवाळी मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहे. दरम्यान बारमतीमध्ये कायम पवार कुटुंब एकत्रित दिवाळी सण साजरा करत असताना यावेळी बारमतीमध्ये वेगवेगळा पाडवा साजरा करण्यात आला. शिवाय याच्यापुढे दरवर्षी बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा केला जाणार असल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. दरम्यान, दरवर्षी संपूर्ण कुटुंबासोबत साजरी होणारा दिवाळी सण यंदा दोन वेगवेगळ्या पद्धतीत पार पडत आहेत. पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत (Baramati) दोन दिवाळी पाडवा पार पडत असल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
बारामतीमध्येच (Baramati) शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपला दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. काटेवाडीत अजित पवारांचा तर गोविंदबागेत शरद पवारांचा पाडवा मेळावा सुरू आहे. दरम्यान, आता यावर अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
दोन ठिकाणी पाडवा-
माध्यमांशी बोलत असताना पार्थ पवार म्हणाले की, बारामतीमध्ये पहिल्यांदाज दोन ठिकाणी पाडवा साजरा होत आहे. या सणाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यभरातून लोक अजितदादांना भेटण्यासाठी आले आहेत याच्या वरूनच आपण अंदाज लावू शकता लोक कुणासोबत आहेत.
याच्यापुढे दरवर्षी बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा केला जाणार अजित पवार हे काटेवाडीमध्येच पाडवा साजरा करणार असल्याचं पार्थ पवारांनी म्हटलं आहे. तर अजित दादांची आणि शरद पवारांची विचारधारा ही वेगळी आहे म्हणून आता पक्ष वेगळा झाला आहे. निवडणूक आहे त्यामुळे भाऊबीज देखील आम्ही लोकांसोबतच साजरी करणार आहोत, लोकांमध्ये संभ्रम नको, असंही पुढे पार्थ पवार म्हणालेत.
News Title : baramati padwa celebration reveals by parth pawar
महत्त्वाच्या बातम्या-
महायुतीला धक्का, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान
संभाजीराव पाटील निलंगेकरांची ताकद वाढली, संपूर्ण निलंगा भाजपमय
मोठी बातमी! दोन्ही ठाकरे एकत्र येणार, मनसे देणार ठाकरे गटाला पाठिंबा?
“प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत”
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी; डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार