कमळ कधीच फुलणार नाही; बारामतीत पोस्टरबाजीतून भाजपला इशारा

पुणे | ‘बारामतीमध्ये कमळ कधीच फुलणार नाही’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये लावून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला इशारा दिला आहे.

बारामतीमध्ये ठिकठिकाणी ‘बारामतीत पुन्हा गोडसेचा जन्म होणार नाही, बारामतीत कधीच कमळ फुलणार नाही’ असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा पोस्टर लावून  बारामतीकरांनी विरोध केला आहे.

गोडसे हा बारामतीलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. ही विचारसरणी कोणाची आहे? कोण जपतय? हे महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे. बारामतीकरांनी हे ओळखलं म्हणून आज त्यांनी हे पोस्टर्स लावले. मी त्यांचे अभिनंदन करतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, देशात मोदी लाट असताना मोदींनी स्वत: बारामतीत राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर सभा घेऊनही राष्ट्रवादीचाच विजय झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार??

‘हे’ माजी उपमुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

-आघाडीला ‘राज’ साथ देणार का? अजित दादांचं आमंत्रण स्विकारणार?

मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल

शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!

Google+ Linkedin