बारामतीनंतर आता माळेगाव कुणाचं?, पवार काका-पुतणे पुन्हा आमनेसामने

Baramati Sugar Factory Elections Another Battle Between pawar

Baramati Sugar Factory Election | माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Sharad Pawar Group) सहभागाबाबत चर्चा रंगली असताना युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. बुधवारी बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत आपल्या भूमिकेवर भाष्य केले. (Baramati Sugar Factory Election)

माळेगाव कारखाना म्हणजे शरद पवारांचा वारसा

युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं की सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पक्षीय आधारावर लढवल्या जात नसल्या तरी, माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी निगडित आहे. “शरद पवार हे या कारखान्याचे सभासद असून, त्यांनी या कारखान्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. माळेगाव कारखाना आणि इथली संस्था त्यांच्याच प्रयत्नातून उभी राहिली आहे,” असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करत, “जर शेतकरी निवडणुकीत उतरतील, तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहू. निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, शेतकऱ्यांसाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही,” असे ठामपणे सांगितले.

राजकारण आणि साखर कारखाने – शक्तीपरीक्षा ठरणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) गटांमध्ये वेगवेगळ्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव केला, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना हरवत वर्चस्व सिद्ध केलं. (Baramati Sugar Factory Election)

आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणता गट विजय मिळवतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. साखर कारखाने आणि राजकारण यांचा नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट आहे.

Title : Baramati Sugar Factory Elections Another Battle Between pawar 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .