बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोळीबारानं बारामती हादरलं! अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर सायंकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे ते पती आहेत. या घटनेनंतर रविराज तावरे यांना बारामतीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.

रविराज तावरे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्याठिकाणी गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार  केला. यात रविराज तावरे यांना गोळी लागली. गोळी लागताच ते जमिनीवर पडले. रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळ क्रिकेट खेळत असलेली पोरं धावत आली.

सर्वांनी मिळून त्यांना उचलून गाडीत बसवलं. त्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. रूग्णालयात त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपचारासाठी खास पुण्यावरून डाॅक्टरांची टीम बोलवण्यात आली आहे. त्यांना पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रविराज तावरे हे माळेगावमधील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्याच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तर तावरे यांच्यावर नेमकी गोळी कोणी झाडली हे आता तपासानंतरच स्पष्ट होईल.

थोडक्यात बातम्या-

“ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रु”

सावधान! ओल्या आणि दमट मास्कमुळे वाढतोय काळ्या बुरशीचा धोका

‘डान्स’मुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महेश लांडगेंनी आळंदीत लावलं लेकीचं लग्न!

संभाजीराजेंंनी केलेल्या हेरगिरीच्या आरोपावर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण!

ब्लॅक फंगसवर ‘हा’ 100 वर्षे जुना फॉर्म्युला ठरतोय प्रभावी; डॉक्टरचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More