बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

पुणे | राज्यात सध्या अनेक मुद्यांवरून विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू आहे. अशात भाजप पक्षाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे.

बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी बारामतीच्या जनतेला केलं आहे. आज पडळकर बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील विविध भागातील वंजारी, तेली, शिंपी, माळी, रामोशी समाजाच्या लोकांसोबत बैठका घेत आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

पवारांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे काम करत आहे. तसेच त्यांचा गळा घोटण्याचेही महापाप ते करत असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चक्क पवारांच्या बालेकिल्ल्यावर जाऊन गोपीचंद पडळकरांनी केलेल्या आवाहनबाबत राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्याला पवार घराणं काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली”

“निलेश राणे, नितेश राणे काहीच करू शकत नाही, कोणामुळे मोठे झालात हे विसरू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More