बसा बोंबलत! ‘पॉर्न’ बघणाऱ्या मुलाला किम जोंगने दिली ‘ही’ शिक्षा
उत्तर कोरिया | उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन त्याच्या क्रूरतेसाठी आणि विक्षिप्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच्या अशाच एका क्रूरतेची चर्चा जगभरात होत आहे. उत्तर कोरियात ‘पॉर्न’ बघणे हा मोठा गुन्हा आहे. त्यासाठी या देशात कडक शिक्षा दिली जाते.
काही दिवसांपूर्वी या देशात एका अल्पवयीन मुलाला ‘पॉर्न’ फिल्म बघत असताना काही अधिकाऱ्यांनी पकडले. त्यानंतर त्या मुलाला व त्याच्या कुटुंबीयांना थेट उत्तर कोरियातील एका रखरखीत भागात पाठविण्यात आले आहे.
त्यांनी कायमचे त्याच भागात राहायचे, असे आदेश देण्यात आले आहेत. या मुलाचे कुटुंब असे एकाएकी बेघर झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. उत्तर कोरियात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या आरोपीला किम जोंगने सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता.
दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी भांडवलशाहीच्या पडझडीचे प्रतीक म्हणून पाळीव कुत्रे पकडण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, या कुत्र्यांच्या मालकांना भीती आहे की या पाळीव प्राण्याचा वापर देशात चालू असलेल्या अन्न संकटावर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो. जुलै महिन्याच्या सुरूवातीस किम जोंग उनने पाळीव कुत्री पाळणे हे कायद्याच्या विरोधात असल्याचे घोषित केले होते.
थोडक्यात बातम्या –
अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
मोठी बातमी : 100 कोटी प्रकरणात आता ‘ईडी’ची एन्ट्री?
…म्हणून या जोडप्यानं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर!
“कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी”; परमबीर सिंग अडचणीत
शरद पवारांनी नाव घेतलेले ज्युलिओ रिबेरो म्हणतात, “हे काम मी करणार नाही!”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.