बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बसा बोंबलत! ‘कंडोम’च्या नादात घालवले तीन लाख रुपये

बिहार | बिहार येथील भांगलपूरच्या घंटाघरजवळ एका व्यक्तीने 70 रुपयांच्या कंडोमसाठी 3 लाख रुपये गमावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घंटाघरजवळ एका मेडिकल स्टोअरसमोर आपली स्कूटी उभी करुन जेव्हा तो व्यक्ती कंडोम खरेदी करायला गेला तेव्हा त्याने त्याच्या गाडीची चावी गाडीलाच सोडली. याचदरम्यान, कुणीतरी स्कूटीची डिक्की उघडली आणि तिथे ठेवलेल्या बॅगमधील 3 लाख रुपये लंपास केले.

मेडिकलमधून तो व्यक्ती परत गाडीजवळ आला आणि चावी पाहून हैराण झाला. पाहतो तर काय! डिक्कीतून पैसे गायब झाल्याचे दिसले. पीडित व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. पोलिसांनी आता तपास सुरु केला आहे. माहितीनुसार, ज्या व्यक्तीचे पैसे चोरीला गेले आहेत. ती व्यक्ती आसाम मध्ये ‘एअरफोर्स’मध्ये आहे.

पीडीत व्यक्तीने सांगितले की, त्याने घंटाघर येथील पोस्ट आॅफिसमधून 3 लाख 10 हजार रुपये काढले. ते रुपये त्याच्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवले आणि घराकडे निघाला. रस्त्यात घंटाघरजवळ थांबून त्याने काही वस्तू खरेदी केल्या. त्या डिक्कीत ठेवल्या. थोडं पुढे जाऊन तो आधी चंदन आर्या नंतर महावीर मेडिकल हाॅलजवळ थांबला. तिथे त्याने 70 रुपायचे ‘कंडोम’ घेतले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मेडिकल स्टोरमधील फुटेजही चेक करण्यात आलं. पण त्यातुन काही लागलं नाही. पोलिस आता इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आहेत.

थोडक्यात बातम्या –

“संजय राठोडांवर कारवाई करण्याची धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो”

पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला 7 पोती शेंदूर, समोर आली तेजस्वी मूर्ती!

रॉबर्ट वाड्रा करणार राजकारणात एन्ट्री; केली ही मोठी घोषणा!

‘अजब सरकारची गजब कहाणी’; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

“संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More