Top News महाराष्ट्र मुंबई

‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

मुंबई | कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन करताना म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत बंगळुर येथे बोलताना सीमावादावर न्यायालयात आमची बाजू सिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या राज्याची भूमी सोडणार नाही, असं बसवराज बोंमई यांनी म्हटलं आहे.

कन्नड भाषिकांची संख्या जास्त असलेले महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत  बोंमई यांनी महाराष्ट्राला इशारा दिला आहे. याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, कर्नाटकची एक इंचही जमीन कुणाला दिली जाणार नाही, असं बी.एस. येडियुरप्पा यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायच याचा निर्णय घ्या”

शेवटी जिंकलोच!… मात्र हा व्हिडीओ करोडो भारतीयांच्या काळजाची धडधड वाढवतोय!

शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार!

ऑस्ट्रेलियन कोचनं भारतीयांबद्दल एक वाक्य असं वापरलं, ज्यामुळे त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

“शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाल्यास तोही नेतृत्व सिद्ध करतोच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या