खेळ

बास झालं आता, धोनीबद्दल काही बोलाल तर खबरदार- रवी शास्त्री

वेलिंग्टन | संथ खेळी करण्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यात महेंद्रसिंग धोनीला सतत लक्ष्य करण्यात येत आहे. यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

धोनी हा दिग्गज खेळाडू आहे. त्याच्यासारख्या महान खेळाडूवर टीका करण्याएवढा कोणीही मोठा नाही. त्याला नावं ठेवणाऱ्यांना क्रिकेट तरी कळतं का? असा प्रश्न भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.

तो 2008 किंवा 2011 मधील धोनी नाही हे खरे आहे. पण त्याचा अनुभव ही संघासाठी मोठी गोष्ट आहे. कारण अनुभव हा बाजारात विकत मिळत नाही, असंही शास्त्री म्हणाले.

दरम्यान, दोन विश्वचषक धोनीच्या नावावर आहेत. त्यामुळे त्याला बोलण्यापूर्वी लोकांनी क्रिकेटचा थोडा अभ्यास करायला हवा, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

-श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा- उद्धव ठाकरे

-चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ‘हे’ माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात!

PMO च्या ‘त्या’ ट्विटमुळं जितेंद्र आव्हाडांचा पहिल्यांदा बसला PMOच्या म्हणण्यावर विश्वास

लोकसभेत राजकीय वातावरण तापलं तर बर्फाच्या वर्षावाने ‘दिल्ली’ गारठली!

तुमची 55 वर्षे आणि माझे 55 महिने करा तुलना, पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या