धडाकेबाज फलंदाज स्टीवन स्मिथ घाबरतो जगातील ‘या’ चार गोलंदाजांना; ‘या’ भारतीयाचा आहे समावेश
मुंबई | ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीवन स्मिथ हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्यासमोर गोलंदाजी करायला दिग्गज गोलंदाज घाबरतात. कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी ट्वेन्टी या तिन्ही फाॅरमॅटमध्ये स्मिथच्या फलंदाजीचा दबदबा आहे. त्यातच आता स्मिथने जागतिक गोलंदाजांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्याच्या काळात सर्वोत्तम गोलंदाजांपैकी कोण आहे?, असा सवाल स्मिथला विचारला गेला. त्यावर त्याने एका भारतीय गोलंदाजाचं नाव घेतलं आहे. त्याने एकूण 4 गोलंदाजाचं नाव घेतलं. त्यात त्याने भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराहचं नाव घेतलं. त्याचसोबत त्याने इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅडरसन आणि दक्षिण अफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा यांचं देखील नाव घेतलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स याचं देखील नाव घेतलं आहे. स्मिथ नाव घेतलेले चारही गोलंदाज जलदगतीचे गोलंदाज आहेत. या चारही गोलंदाजांचा जागतिक क्रिकेटमध्ये मोठा दबदबा आहे. सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत अॅडरसनच्या क्रमांक तिसरा आहे. तर हे चारही खेळाडू आपाल्या देशातील प्रमुख गोलंदाज आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्टीवन स्मिथ दुखापतग्रस्त आहे. येत्या टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी स्टीवन स्मिथच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहेत. सध्या चालू असलेल्या बांग्लादेश विरूद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
थोडक्यात बातम्या-
राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाच्या बहिणीची बिग बाॅसमध्ये एंट्री, पाहा व्हिडीओ!
“पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या अन् हिम्मत असेल तर चर्चा करा”
‘नावात काय आहे’ म्हणणाऱ्यांना झटका, ‘हे’ नाव असेल तर 501 रुपयांचं पेट्रोल फुकट मिळणार!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रासोबत चर्चा करायला पाहिजे होती – रावसाहेब दानवे
‘सत्ता आली तरी तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानं दिला घरचा आहेर
Comments are closed.