बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…

पुणे | केंद्र सरकार झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे.  महाराष्ट्रातून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही आरोप केला होता. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

मी काही राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी झारखंडला कधीच गेलो नव्हतो. झारखंडच काय रांचीलाही गेलो नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या 181 आमदारांपैकी एकाही आमदाराचा नंबर माझ्याकडे नाही. मी काही राष्ट्रीय नेता नाही. मी महाराष्ट्रातील भाजपचा एक छोटा कार्यकर्ता असून सचिव म्हणून काम करतो आणि हे सगळं कपोलकल्पित असल्याचं बावनकुळे म्हणाले.

नाना पटोलेंनी माझ्यावर आरोप केला. पण आमचा एकही आमदार भाजपच्या संपर्कात नाही, हे आजच झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांंगितलं आहे. अशा पद्धतीने मला आणि भाजपला जाणीवपुर्वक बदनाम करत असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांना 50 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर होती. हे पैसे पुरग्रस्तांना आले असते मात्र झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजप यंत्रणा काम करत असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

महत्त्वाची बातमी! राज्यातील 25 जिल्हयांमधील निर्बंध शिथिल तर या 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

“राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पाचे संंबंध ठीक नाहीत”

‘अजित पवारांनी भाषेबाबत बोलणं म्हणजे राज कुंद्राने…’; नितेश राणेंची जोरदार टीका

नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More