येत्या 7 दिवसांत वीजबिल भरा, नाहीतर कनेक्शन तोडण्यात येईल!

मुंबई | येत्या 7 दिवसांत वीजबिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा फतवा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलाय. महावितरणला थकबाकी परवडत नसल्यानं हा फतवा काढण्यात आलाय.

राज्यातल्या 41 हजार शेतकऱ्यांकडे 19 हजार कोटींची थकबाकी आहे. 3 वर्षांत सरकारनं कृषिपंपांची वीज कापलेली नाही, पण आता सरकारला खर्च परवडत नसल्यानं हा इशारा देण्यात आलाय.

ज्यांचं बिल जास्त आहे त्यांना मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजनेत सहभागी होण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येतंय. मात्र शेतकऱ्यांची येत्या 7 दिवसांत वीजबिल भरण्याची क्षमता आहे का, असा प्रश्न विचारला जातोय