मराठा आरक्षणावरून बावनकुळेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | भाजप(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) नेहमीच महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात. त्यातच त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्षाने टाईमपास केला आणि सभागृहाचा वेळ वाया घालवला. महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं वक्तव्यही बावनकुळे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) काॅंग्रेसच्या कार्यलयात बसतात याचं दु:ख राष्ट्रवादीला होत आहे, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं.

धान्याला बोनस देण्यासाठी नाना पटोलेंनी अडीच वर्षे अजित पवारांसमोर(Ajit Pawar) नाक रगडलं. परंतु युतीचं सरकार येताच 15 कोटींच्या बोनसची घोषणा केली, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवारांनाही(Sharad Pawar) टोला लगावला आहे. मराठी समाजाचं आरक्षण पवारांमुळं गेलं आहे, असं म्हणत त्यांनी पवारांवर गंभीर आरोप केला आहे.

मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असं पवार सांगत आहे. त्यांच्या पोटातलं आता ओठात आलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही बावनकुळेंनी पवारांना डिवचलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe