Top News विदेश

BBCला सर्वात मोठा धक्का; ‘या’ देशाने प्रसारणावर आणली बंदी

बिजिंग | बीबीसी वर्ल्ड या वृत्तवाहिनीला चीनमध्ये प्रसारण करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.  ग्लोबल टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. ‘बीबीसी वर्ल्ड’ने कोरोना संदर्भात खोट्या बातम्या प्रकाशित केल्याचा तसेच शिंजियांग प्रदेशातील मुस्लिम आणि अल्पसंख्याकांवर छावण्यांमध्ये अन्याय होत असल्याच्या खोट्या आणि देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्याचा आरोप आहे.

प्रसारणाशी संबंधित असलेल्या नियमांचे उल्लंघन वाहिनीने केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे चीनच्या नॅशनल रेडिओ अँड टेलिव्हिजन ऍडमिनिस्ट्रेशनने जाहीर केले आहे. त्यामुळे बीबीसीला चीनमध्ये मोठा धक्का बसला आहे.

चीनच्या एका विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक वांग सिक्सिन सांगतात की, बीबीसीला प्रक्षेपण करण्यास थांबवणे म्हणजे चीनच्या कोणत्याही भागात बीबीसी आता दिसणार नाही, त्याचबरोबर सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा यापुढे बीबीसीला मिळणार नाहीत. ग्लोबल टाइम्सशी बोलताना त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

बीबीसीने यावर प्रतिक्रिया देताना झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगितलं आहे. ब्रिटन आणि अमेरिकेने चीनच्या या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे.

थोडक्यात बातम्या –

“पवारांसारख्या भ्रष्ट राजकारण्याच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण नको”

भाजप-मनसे युती होणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

साताऱ्यात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

विधानसभा अध्यक्षपद पुण्याला मिळणार?; ‘या’ नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या