बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठरलं तर! अचानक रद्द झालेला ‘तो’ निर्णायक कसोटी सामना पुढच्या वर्षी होणार

नवी दिल्ली | भारत आणि इंग्लड या दोन्ही संघात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरूवातीचे चार कसोटी सामने झाल्यानंतर पाचवी कसोटी कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल 42 दिवसानंतर बीसीसीआय आणि ईसीबी या दोन्ही मंडळामध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीबाबत तो़डगा निघाला असून या कसोटी सामन्याचं आयोजन पुढच्या वर्षी करण्यात येणार आहे.

पाच कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. भारत इंग्लड विरूद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. तेव्हा 1 ते 5 जुलै दरम्यान पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. याबाबत इंग्लड क्रिकेट बार्डाने ट्विट केलं आहे.

पाचवी कसोटी ही 10 ते  15 सप्टेंबर रोजी होणार होती. त्याआधी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पाचवी कसोटी रद्द करण्यात आली होती. तसेच हा कसोटी सामना कसोटी विश्वचषक स्पर्धेचाच भाग असल्याचं इंग्लड क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

दरम्यान, भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर ही भारताला विजयी घोषित करण्यात आलं नव्हतं. याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र या कसोटीवर बीसीसीआय आणि इंग्लड क्रिकेट बोर्डाने चर्चा करून अखेर तोडगा काढला आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या- 

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

आयपीएलमध्ये पुन्हा बाॅलिवूडची एन्ट्री! रणवीर-दीपिका घेणार नवीन संघ विकत

भर कार्यक्रमात आढळला बंदूकधारी व्यक्ती; योगी आदित्यनाथ यांनी थेट अधिकाऱ्यांवर कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More