क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार

Duleep Trophy 2024

Duleep Trophy l क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुलीप ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या फेरीसाठी चार संघांची घोषणा केली आहे. दुलीप ट्रॉफीच्या माध्यमातून देशांतर्गत हंगामात रेड बॉल क्रिकेटला सुरुवात होणार आहे. या व्यासपीठावर युवा आणि उदयोन्मुख कलागुणांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे.

दुलीप ट्रॉफी कधी सुरु होणार? :

दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून 22 सप्टेंबर रोजी अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. यावेळी शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि अभिमन्यू ईस्वरन हे चार खेळाडू संघांचे कर्णधार असणार आहेत. विशेष बाब म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, आर. अश्विन अन् जसप्रीत बुमराह दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत.

भारताचा ODI आणि T20 आंतरराष्ट्रीय उपकर्णधार शुभमन गिल आणि KL राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांसारखे अनेक भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये स्थान देण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

Duleep Trophy l दुलीप ट्रॉफीचे चार संघ जाहीर! :

Team A : शुभमन गिल (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशागरा, शास्वत रावत,

Team B : अभिमन्यू इस्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, यश दयाल, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, राहुल चहर, आर. साई किशोर, एन. जगदीसन, मोहित अवस्थी

Team C : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक पोरेल, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, बी. इंद्रजिथ, रितीक शोकीन, उमरान मलिक, व्यषक विजयकुमार, मानव सुथार, अन्सुल कंबोज, हिमांशु चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल,संदीप वॉरिअर

Team D : श्रेयस लियर (कर्णधार), अथर्व तायडे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, यश दुबे, रिकी भुई, सरांश जैन, हर्षित राणा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.

News Title- BCCI Annouced Duleep Trophy 2024-25

महत्वाच्या बातम्या-

महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सर्व दवाखाने राहणार बंद; इमर्जन्सी असल्यास काय?

“नवाब सैफ अली खान तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत?”; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

‘हा’ बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर; भाजपला मोठा धक्का?

रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त 5G Smartphones, किंमत तुमच्या बजेटमध्येच

राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली माहिती

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .