बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; टी 20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे

मुंबई | T-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी समाघानकारक झाली नाही. विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यापूर्वीच भारतीय संघाचा प्रवास संपला. विश्वचषक स्पर्धेतून भारताला बाहेर पडावं लागलं असलं तरी भारतीय संघ आता आगामी सामन्यांसाठी सज्ज झाला आहे.

14 नोव्हेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाली की 17 नोव्हेंबर पासून भारतात 5 संघांचे टी-20 सामने रंगणार आहेत. या सामन्यांचे वेळापत्रकही नुकतंच जाहीर करण्यात आलं. यात भारतासह, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरूद्ध रंगणार असून बीसीसीआयने संघही जाहीर केला आहे.

या सामन्यासाठी कर्णधार पदाची धूरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. के एल राहुल संघाचा उपकर्णधार आहे. तर ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर आश्विन, अक्सर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दिपक चहर, हर्शल पटेल आणि मोहम्मद सिराज यांची निवड करण्यात आली आहे.

तर विश्वचषक 2021 मध्ये खेळलेल्या 8 खेळाडूंना न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात  विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड विरूद्धचे हे टी-20 सामने 17 , 19 आणि 21 नोव्हेंबर रोजी खेळवे जाणार आहेत. टी-20 सामन्यानंतर 25 ते 29 नोव्हेंबर आणि 3 ते 7 डिसेंबर असे दोन कसोटी सामने रंगणार आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

“नारायण राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही”

“शरद पवारांनाही कळू द्या त्यांचे मंत्री काय कांड करतात ते”

‘या’ बँकेवर RBI ची कारवाई; जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला…

‘या’ शिवसेना नेत्याच्या घरी सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांकडून पर्दाफाश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More