बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL Auction चा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार मेगा लिलाव

मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला ओळखण्यात येतं. आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआय कोट्यावधी रूपये कमावत असते. आयपीएलमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक घटकाला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळत असतो. खेळाडूंना लिलावाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये मिळतात. परिणामी लवकरच होणाऱ्या मेगा लिलावाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आयपीएल 2022 साठी नवीन दोन संघ सामिल झाल्यानं आता अधिक रोमांच पहायला मिळणार आहे. दर तीन वर्षांनी बीसीसीआयकडून खेळाडूंचा लिलाव घेण्यात येतो. आता पुढील तीन वर्षांसाठी खेळाडूंचा लिलाव हा दोन दिवस पार पडणार आहे. 7 आणि 8 फेब्रुवारी या दोन दिवशी मुंबई अथवा कोरोनाच्या परिस्थीचा आढावा घेऊन  तत्सम ठिकाणी ही प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटच्या परिणामी भारतातच लिलाव प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून आद्यापी ठिकाणाबद्दल काही स्पष्ट केलं गेलं नाही. बीसीसीआयकडून लिलावाची तयारी चालू करण्यात आली आहे. नवीन दोन संघाना लिलावा अगोदर 3-3 खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली आहे. पण अद्यापी या दोन्ही संघांकडून नावं जाहीर करण्यात आली नाहीत.

दरम्यान, लखनऊ आणि अहमदाबाद या संघाच्या समावेशानं आयपीएलमधील खेळाडू निवडीचं समीकरण बदलणार आहे. दिल्लीचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी बीसीसीआयच्या दर तीन वर्षांनी लिलाव घेण्याच्या पद्धतीवर नाराजी वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या 

लसीकरण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

राहुल गांधी म्हणतात,”प्रभू श्रीराम म्हणजे न्याय आहे, धर्म आहे आणि सत्य आहे”

“भाजपला लाज वाटली पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी”

भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा! आशिया कप स्पर्धेत पटकावलं कांस्य पदक

“हे बालिशपणाचं लक्षण, आपला बाप आजारी असताना…”, आव्हाड संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More