भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखेर भरत अरुण!

मुंबई | भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखरे भरत अरुण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा हट्ट पुरवल्याचं दिसतंय.

सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने झहीर खानची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र हवा शास्त्रींना भरत अरुण हवे असल्याने वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बांगरची यांची तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी  शिवा. आर. श्रीधर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या