खेळ

आता IPL मधील पंच आणि कर्णधारांमधील राडेबाजी होणार बंद; BCCIनं घेतला मोठा निर्णय

मुंबई | भारतीय क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर क्रिकेटमध्ये मोठे बदल केले. दरम्यान आता इंडियन प्रिमीअर लीगला अधिक सक्षम आणि रोमांचक करण्यासाठी विविध नवे नियम लागू केले जाणार आहेत. आयपीएलमध्ये आता 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार आहेत.

मैदानावर 11 खेळाडू असतील आणि 4 खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्येच असतील. पण संघात त्यांना गरज पडेल तसं घेण्यात येईल. याआधी फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी इतर खेळाडू उतरत होते, आता हे चार खेळाडू बदली खेळाडू म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी उतरतील.

आयसीसीच्या वतीनं आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही चार पंच असणार आहेत. आता आयपीएलला सक्षम करण्यासाठी या स्पर्धेतही चार पंच असणार आहेत. यातील चौथ्या पंचाचे काम खास असणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात मुख्यत: नो-बॉलबाबत पंचांकडून चुकीचे निर्णय घेण्यात आले.

आता स्पोर्ट्स स्टारनं दिलेल्या बातमीनुसार फक्त नो-बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी आता एका पंचाची नेमणुक करण्यात येणार आहे. मात्र आयपीएल 2020 मध्ये हा नियम लागू होणार नाही, असंही यावेळी सांगण्यात आलं.

 महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या