बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2022ची रंगत वाढली! जाणून घ्या कोणता संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार

मुंबई | आयपीएलचा आगामी 15 वा हंगाम आणखीनच धमाकेदार होणार आहे. कारण यंदा लखनऊ आणि अहमदाबाद फ्रॅंचायझींचा समावेश झाला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये पुढच्या वर्षी 10 संघ मैदानात उतरणार आहेत. बीसीसीआयने आयपीएल 2022 साठी लिलावासंदर्भात नियम जारी केले आहेत. त्या नियमानुसार मागील 8 संघांना प्रत्येकी 4 खेळाडू संघात कायम ठेवता येणार आहे.

आयपीएल 2022 साठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील आयपीएलच्या 8 संघांना प्रत्येकी 4 खेळाडूंची नावे डिसेंबरपर्यंत बीसीसीआयकडे द्यायाची आहेत. त्यामुळे कोणता संघ कोणत्या खेळांडूना संघात कायम ठेवणार आहेत, ते आता पाहावं लागणार आहे. तसेच मागील आयपीएलच्या कामगिरीवरून खालील खेळांडूना फ्रॅंचायझी संघात कायम ठेवू शकतो.

मुंबई इंडियन्स– रोहित शर्मा, इशान किशन, जसप्रीत बुमराह, (कायरन पोलार्ड किंवा ट्रेंट बोल्ड)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू– विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, (मोहम्मद सिराज किंवा हर्षल पटेल)

चेन्नई सुपर किंग्स– महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, (मोईन अली किंवा फाफ डुप्लेसिस)

दिल्ली कॅपिटल्स–  रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शिखर धवन, (श्रेयस अय्यर किंवा कागिसो रबाडा)

कोलकाता नाईड रायडर्स– शुबमन गिल, दिनेश कार्तिक, व्यंकटेश अय्यर, ल्यॅुकी फर्ग्युसन

सनरायझर्स हैदराबाद– केन विलियम्सन, जॉनी बेअरस्ट्रो, वृद्धीमान सहा आणि मनिष पांडे.

राजस्थान रॉयल्स– संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, जोफ्रा आर्चर आणि जोस बॅटलर.

पंजाब किंग्स– मोहम्मद शमी, शाहरूख खान, मयंक अग्रवाल, आणि अर्शदिप सिंग.

आयपीएलच्या 14 व्या हंगामात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या पंजाब किंग्सचा कर्णधार के.एल.राहुलला रिलीज करण्याची मागणी फ्रॅंचायझींकडे केली जात आहे. तर  दिल्ली कॅपिटल्स संघांचा कर्णधार होण्यासाठी श्रेयस अय्यर आतुर आहे, मात्र रिषभ पंतच्या कामगिरीकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याकडे कर्णधारपद देण्याची शक्यता खुप कमी आहे. त्यामुळे या दोघांबाबत अजूनही निर्णय झाला नाही आहे.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

शहनाजने सिद्धार्थला दिला ट्रिब्यूट; ‘या’ खास गाण्यातून वाहिली श्रद्धांजली

“बाळासाहेब नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, सरकार कोणावरही अन्याय करणार नाही”

टेनिस कोर्टातून थेट राजकीय मैदानात! लिंएडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश

“माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, मी साधी सिगारेट देखील ओढत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More