BCCI चं ऐतिहासिक पाऊल, क्रिकेटपटूंसाठी जय शाह यांची सर्वात मोठी घोषणा!

BCCI | बीसीसीआय सचिव जय शाह यांनी क्रिकेटपटूंसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक ट्वीट करत नवीन निर्णय जाहीर केला आहे. आता महिला आणि ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात येणार आहे. बीसीसीआय सचिवांच्या घोषणेमुळे महिला आणि ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना मोठा फायदा मिळणार आहे. (BCCI)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी बीसीसीआयने हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जय शाह यांनी सांगितले की, आता बोर्ड देशांतर्गत क्रिकेटमधील महिलांच्या सर्व स्पर्धांमध्ये आणि ज्युनियर क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमध्ये सामनावीर आणि टूर्नामेंटचा सर्वोत्तम पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार म्हणून पैसेही देणार आहे.

जय शाह यांचं ट्वीट नेमकं काय?

“देशांतर्गत महिला आणि ज्यूनिअर क्रिकेट स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ आणि ‘मॅन ऑफ मॅच’ पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे या पुरुषांच्या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला रक्कम दिली जाणार आहे”, असं जय शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

“यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्रोत्साहन देणं आणि त्याची ओळख तयार करणं हे उद्देश होतं. यासाठी एपेक्स काउन्सिलने सहकार्य केलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आम्ही आपल्या सर्व खेळाडूंसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, जय हिंद”, असंही जय शाह यांनी म्हटलं आहे.(BCCI)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पडणार बक्षिसांचा पाऊस

दरम्यान, मागच्या वर्षी बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या विजयी रक्कमेत वाढ केली होती. त्यात रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला 5 कोटी रोख रक्कम देण्यात आली. तसेच इराणी कप स्पर्धेच्या विजयी रक्कमेत देखील वाढ करण्यात आली. त्यानुसार 25 ऐवजी 50 लाख रुपये देण्यात आले. तर उपविजेत्यांना 25 लाख रुपये देण्यात आले.

याचबरोबर दुलीप ट्रॉफी विजेत्या संघाला 1 कोटी तर उपविजेत्यांना 50 लाख रुपये देण्यात येणार आहे. तर विजय हजारे स्पर्धेतील विजयी संघालाही 1 कोटी तर उपविजेत्यांना 50 लाख रुपये दिले जातील.(BCCI)

News Title – BCCI jay shah announced prize money for domestic cricket

महत्त्वाच्या बातम्या-

“आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा?”; मालवण घटनेने राज ठाकरेंचा संताप

आज दहीहंडीचा सण, श्रीकृष्णाची कृपा कुणावर असणार?; वाचा आजचे राशीभविष्य

वसंत मोरेंना ठाकरे गटाकडून मिळणार आमदारकीचं तिकीट? ‘या’ मतदारसंघात लढणार

कर्मचाऱ्यांनो महाराष्ट्रात नवीन पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार? जाणून घ्या

राजकीय उलथापालथ! महायुतीचे 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?