बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हार्दिकनं केल्या दांड्या गुल! सामन्यात असं काही केलं की…लाखोंचं नुकसान झालं

पुणे | आयपीएलचे सामने जसजसे होऊ लागले आहेत तसतसं रंगत आणखीनच वाढत आहे. आतापर्यंतच्या सामन्यात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टेबल टाॅपर असणारा गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक सध्या एका कारणानं गाजत आहे.

राजस्थान आणि गुजरात दरम्यानच्या सामन्यावेळी हार्दिकच्या एका कृत्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे. हार्दिकनं या सामन्यात आपल्या अष्टपैलूत्वाची सर्वांना झलक दाखवली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला हार्दिकनं एका अप्रतिम थ्रोवर रन आऊट केलं.

हार्दिकनं लगावलेला थ्रो इतका वेगवान होता की थ्रोमुळं संजू तर आऊट झालाच पण बीसीसीआयचं मोठं नुकसान देखील झालं. थ्रो लागल्यामुळं स्टंपवर लावलेली एलईडी फुटली आहे. परिणामी लाखोंचं नुकसान झालं आहे. हार्दिकचा हा थ्रो सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, राजस्थानवर विजय मिळवत गुजरात संघ सर्वाधिक गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. मातब्बर संघ मात्र गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत.

थोडक्यात बातम्या – 

गायिका आशा भोसलेंचा मुलगा दवाखान्यात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

“…तर कारवाई केली जाईल”; रुपाली ठोंबरेंची थेट राज ठाकरेंवर टीका

…अन् भर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा माफीनामा वाचून दाखवला

“…म्हणून भाजप ठाकरे सरकारवर दबाव आणतंय”, पवारांनी सांगितलं कारण

“मनसे आता उद्धव ठाकरेंचे वडीलही हायजॅक करणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More