Top News खेळ

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, ‘दादा’ होम क्वारंटाईन

कोलकाता | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलेलं. यानंतर गुरुवारी गांगुली कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळेच सौरव गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिन स्नेहाशीष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

स्नेहाशीष यांनी कोरोना चाचणी करून घेतली आणि त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलंय. त्यामुळे आता सौरव गांगुलीसह कुटुंबातील सर्व सदस्य सेफ्ल आयसोलेट झालेत. लवकर त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

बंगाल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”गेल्या काही दिवसांपासून स्नेहाशीष यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. बुधवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल आला. ते पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सुरक्षिततेची काळजी म्हणून गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे,”

मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांनी 8 जुलैला कुटुंबातील सदस्यांसोबत वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आता त्यांना 10 दिवस सेल्फ आयसोलेट व्हावं लागणार आहे. स्नेहाशीष हे मागील महिन्यातच कोरोना ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

महाजाॅब योजना महाविकास आघाडीची की शिवसेना-राष्ट्रवादीची?; ‘या’ काँग्रेस नेत्यानं व्यक्त केली नाराजी

“आता रडून काय फायदा?, तुला तुझ्या पापाची फळं याच जन्मात भोगावी लागणार”

ईश्वर रूपी देवता ये… अमिताभ बच्चन यांनी लिहीली भावनिक कविता

विकास दुबे गॅंगनं कशी केली 8 पोलिसांची हत्या?; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी उघड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.