खेळ

वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. यासंदर्भात BCCI ने जाहिरात देखील दिली आहे. मात्र या कोच निवड प्रक्रियेतून भारताचा कर्णधार विराट कोहलीला वगळण्यात आलं आहे.

2007 ला रवी शास्त्री यांची कोच म्हणून निवड करताना विराटचं मत विचारात घेतलं होतं. यावेळी मात्र कपिल देव यासंदर्भात निर्णय घेणार आहेत.

2017 ला विराटने तत्कालीन कोच अनिल कुंबळेंसोबत काम करण्यावर हरकत घेतली होती आणि विराटच्या सांगण्यावरून कुंबळेंना पदावरून हटवण्यातही आलं होतं.

आता कोचसंर्दभातला निर्णय माजी क्रिकेटपटू कपिल देव घेतील, त्यानंतर प्रशासकीय समिती यावर शिक्कामोर्तब करेन. शिवाय टीम इंडियाच्या सपोर्ट टीमची निवडही सिलेक्टर्सच करतील. गेल्यावेळी स्वत: रवी शास्त्रीनींच सपोर्ट स्टाफची निवड केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

-‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

विमा कंपनीच्या नफ्यात आजपर्यंत कुणी वाटा घेतला??; राजू शेट्टींची घणाघाती टीका

-भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’

-विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप; म्हणतात… 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या