बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बीसीसीआयने 700-800 कोटींची मदत करावी, देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ”

नवी दिल्ली | कोरोनाने देशभरात हैदोस घातलेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. एकीकडे काळाप्रमाणे आव वासून बसलेला कोरोना आहेच मात्र आता ऑक्सिजनचा तुटवडा पडू लागल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यानंतर अनेकजण पुढाकार घेत मदत करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेटरांसोबतच परदेशी खेळाडूंनीही मदत केली आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी बीसीसीआयला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

आयपीएल 2020 आणि आयपीएल 2021 मधून बीसीसीआयला मिळणाऱ्या उत्पन्नातील 10 टक्के रक्कम बीसीसीआयनं कोरोनामुळे निधन झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी दान करावेत, असं ललित मोदी यांनी म्हटलं आहे. 10 टक्के रक्कम म्हणजे 700 ते 800 कोटी, हे गणितही मोदींनी समजावून सांगतिले. मिड डे शी ते बोलत होते.

मागील दोन वर्षांत आयपीएलमधून केलेल्या कमाईतील 10 टक्के रक्कम बीसीसीआयनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी द्यावी. फॅन्समुळेच भारतात क्रिकेट एवढा मोठा झाला आहे. ही कृती करायची आणि देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे. आयपीएल यापेक्षा अधिक करू शकतं, पण मला हे कळतं नाही त्यांना कोण रोखत आहे. प्रत्येक जीवाचे, प्रत्येक भारतीयाचे आयुष्य महत्त्वाचे आहे. ही वेळ एकजुटता दाखवण्याची आणि एकत्र येऊन लढण्याची असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

दमरम्यान, याआधी कोरोनाच्या संकटात पॅट कमिन्स, ब्रेट ली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, सचिन तेंडुलकर, शेल्डन जॅक्सन, अशा अनेकांनी भारताला मदत केली आहे, ललित मोदींच्या या मागणीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

अवघ्या 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन!

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

ममता बॅनर्जी यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड; 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

‘आमच्याशी असं वागण्याची तुमची हिंमत कशी झाली?’; आयपीएल समालोचकाचा पंतप्रधानांना सवाल

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला…’; अदर पुनावाला यांनी दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More