बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चुकीला माफी नाही! KL Rahul आणि Rashid Khan यांंच्यावर 1 वर्ष बंदीची शक्यता

नवी दिल्ली | आयपीएल (IPL) स्पर्धा ही क्रिकेटमधील कुबेराची खाण मानली जाते. प्रसिद्धी, नाव, अमाप संपत्ती, आकर्षक लाईफस्टाईल, या गोष्टींवरून आयपीएल अल्पावधीत जगातिक सर्वाधिक लोकप्रिय लीग (Most Populer Cricket League) बनली आहे. अशात आयपीएलला (Ipl) अनेकदा गालबोट सुद्धा लागलं आहे. अशातच आता भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि जगविख्यात फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) वादात अडकले आहेत.

गत काही वर्षांपासून टी-ट्वेंटी प्रकारातील सर्वाधिक धोकादायक फलंदाज (Batter) म्हणून केएल राहुलला ओळखण्यात येतं. सहाजिकच राहुल आपल्या संघात आसावा अशी प्रत्येक संघाची इच्छा आहे. परिणामी सध्या येऊ घातलेल्या आयपीएल लीलावाच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यंदा नव्यानं समावेश झालेल्या लखनऊ संघाकडून केएल राहुल आणि राशिद खान यांना संपर्क झाल्याची घटना घडली आहे.

नवीन फ्रंचायझीकडून (New Ipl Team) केएल राहुल आणि राशिद खान यांच्याशी संपर्क करून आमच्या तयारीवर परिणाम होत आहे, असं पंजाब (Punjab) आणि हैदराबाद (Heydrabad) या संघ व्यवस्थापकांकडून तक्रार करण्यात आली आहे. बीसीसीआयकडून अद्याप लिखीत तक्रार दाखल झाली नसल्याचं म्हटलं गेलं आहे. केएल राहुल आणि राशिद खान यांच्याकडून काही गैरव्यवहार केल्याचं आढळलं तर कारवाई होणार आहे.

दरम्यान, लखनऊ संघाकडून या दोन्ही खेळाडूंवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पंजाब आणि हैदराबाद या संघानी केला आहे. परिणामी बीसीसीआय या प्रकरणाला गांभिर्यानं घेणार आहे.

थोडक्यात बातम्या 

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या ‘त्या’ भेटीविरोधात गृहमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

‘शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली’

12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘दी़ड फूटी उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झाला आहे’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More