भारतीय क्रिकेटपटूंच्या नोकऱ्यांवर गदा, बीसीसीआयचं नवं फर्मान

नवी दिल्ली | बीसीसीआयनं भारतीय क्रिकेटपटूंना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या सोडण्यास बजावलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला नुकतेच यासंदर्भात आदेश दिले होते. 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ओएनजीसीचं मॅनेजरपद सोडण्यास सांगण्यात आलंय. तसेच अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कामाला असलेल्या तब्बल १०० क्रिकेटपटूंना नोकऱ्या सोडण्यास सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, कोणताही क्रिकेटर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचं कोणतंही पद भूषवणार नाही असं क्रिकेट प्रशासक समितीने बोर्डाला सांगितलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या