मुंबई | दिल्लीमध्ये सुरु असलेलं आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केलं आहे.
रावसाहेब दानवें यांच्या या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार समाचार घेतला आहे. रावसाहेब दानवे यांचं म्हणणं दुर्देवी आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावं लागेल, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. बच्चू कडू यांनीही रावसाहेब दानवे यांचं म्हणणं दुर्देवी आहे, असं म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
‘आम्ही शिर्डीत जाणारच…’; नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा
“जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलंय, ते सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत”
धक्कादायक! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन!
“रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही”