आताच व्हा सावधान; सॅनिटरी पॅड घेऊ शकतं जीव

मुंबई | पिरियड्स अर्थात मासिक पाळी (Menstrual Cycle) ही कितीही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी चारचौघात याबद्दल बोलताना अगदी महिलाही बिचकतात. पण गेल्या काही वर्षांपासून कुठेतरी या विषयांवर मोकळेपणाने बोलायला सुरूवात झाली. मासिक पाळी आणि त्यातून होणारे अनेक गंभीर आजार टाळण्यासाठी सॅनिटरी पॅडबाबत (Sanitary Pad) काही वर्षांपासून जनजागृती केली जातीये.

मासिक पाळीत जुन्या फाटक्या कपड्यांचा वापर करणं ते आता सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पॉन किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर असा बदल आपण पाहिला. 15 ते 24 वयोगटातल्या जवळपास 65 टक्के महिला आज सॅनिटरी पॅडचा वापर करतात.

पण कपडे, किराणा, औषधं यासगळ्या वस्तूंप्रमाणे आपल्यापैकी किती जणींना आपण वापरत असलेल्या सॅनिटरी पॅडबद्दल सगळं काही माहिती आहे? किंवा कितीजणींच्या मनात हा प्रश्न आला की आपण वापरतो ते सॅनिटरी पॅड खरंच किती सुरक्षित आहे?

आपल्याकडे मासिक पाळीत सॅनिटरी पॅडचा वापर सुरक्षित मानला जातो. त्यामुळेच आज देशातल्या साधारण करोडो मुली आणि महिला सॅनिटरी पॅड वापरतात. मासिक पाळीत सुरक्षित मानला जाणारा सॅनिटरी पॅड संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण करतो पण आता सॅनिटरी पॅडच्या याच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सॅनिटरी पॅडमुळे खरंच कॅन्सर (Cancer) होतो? जर सॅनिटरी पॅड आरोग्यासाठी घातक आहेत तर मग वापरायचं काय? कॅन्सर किंवा अशा अनेक गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी योग्य पॅड कसा निवडावा हे सगळं आपण जाणून घेऊ.

भारतात विकल्या जाणार्‍या लोकप्रिय सॅनिटरी पॅडमध्ये हृदयविकार, मधुमेह (Diabetes) आणि कॅन्सरशी संबंधित काही केमिकल्स आढळून आल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं. दिल्लीतील टॉक्सिक्स लिंक (Toxics Link) या स्वयंसेवी संस्थेनं यासंबंधित एक अहवाल सादर केलाय.

बाजारात उपलब्ध असलेल्या एकूण दहा नमुन्यांपैकी सहा अकार्बनिक आणि चार कार्बनिक सॅनिटरी पॅडमध्ये फॅथलेट्स आणि volatile organic compounds अर्थात VOCs आढळून आलेत. ‘मेन्स्ट्रुअल वेस्ट 2022’ (Menstrual Waste 2022)  या अहवालात हे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत.   

सेल्फ डिक्लेअर्ड ऑरगॅनिक सॅनिटरी पॅडमध्ये (Organic) फॅथलेट्सचं (Phathalets) प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आलंय. अभ्यासानुसार, सर्व प्रकारच्या सॅनिटरी पॅड्समध्ये DIPB, DBP, DINP, DIDP आणि इतर फॅथलेट्सच्या उपस्थितीसाठी चाचणी करण्यात आली. यामध्ये केमिकलचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून आलं आणि सॅनिटरी पॅड वापरणाऱ्या महिलांच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते हे स्पष्ट झालं.

फॅथलेट्सच्या संपर्कात आल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीत आजार, मधुमेहाचे विकार, विशिष्ट प्रकारचा कॅन्सर आणि प्रजनन विकार झाल्याची नोंद आहे. VOCs च्या संपर्कात येण्याने मेंदूमध्ये कमजोरपणा, दमा, अपंगत्व, विशिष्ट कर्करोग आणि प्रजनन प्रणालीचे कार्य बिघडण्याचा धोका वाढतो.

सॅनिटरी पॅडमध्ये आढळणारे रसायन Volatile Organic Compound  सर्वात जास्त हानिकारक आहे. यातले केमिकल्स सहजपणे बाष्पीभवन होऊन हवेत विरघळतात. हे केमिकल्स पेंट्स, डिओडोरंट्स, एअर फ्रेशनर, नेल पॉलिश, कीटकनाशकांमध्ये वापरले जातात. आरोग्यासाठी घातक ठरणारे हे केमिकल्स सॅनिटरी पॅडमध्ये सुगंध आणण्यासाठी वापरतात. त्यामुळे रंगीबेरंही पॅकींगमध्ये येणारे सुगंधी सॅनिटरी पॅड त्यांची पॅकिंग, सुगंध, ब्रँड यावरून पॅड निवडण्याआधी त्याच्याबद्दलची सगळी माहिती, त्यातल्या केमिकल्सबद्दल जाणून घ्या.

जर अशे सॅनिटरी पॅड आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत तर मग नक्की कुठले पॅड वापरावे?

तर…. आजकाल बाजारात अनेक कंपन्यांचे ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स उपलब्ध आहेत, जे बायोडिग्रेडेबल (Biodegradable) आहेत. त्यामुळे हे पॅड्स आपल्या आरोग्याइतकेच पर्यावरणासाठीपण चांगले आहेत. तसेच सध्या बाजारात कॉटनचे सॅनिटरी पॅड पण उपलब्ध आहेत. जे आरोग्यासाठी चांगले आहेतच पण हे रियुजेबल देखील आहे. त्यामुळे काही हानिकारक सॅनिटरी पॅडच्या ऐवजी तुम्ही ऑरगॅनिक आणि कॉटनचे सॅनिटरी पॅड देखील वापरू शकता.

रियुजेबल कॉटन पॅड वापरा, मासिक पाळीत किमान 4 ते 6 तासांनी सॅनिटरी पॅड बदला, स्वच्छता राखा आणि आरोग्याबाबत जागरूक राहा. सॅनिटरी पॅड खरेदी करताना कधीही टिव्हीवरची जाहिरात किंवा वरचं पॅकेट पाहून पॅड खरेदी करू नका, त्यामध्ये दिलेली माहिती वाचूनच योग्य पॅड निवडा.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More