पुणे | पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.
पुण्यामध्ये आज दिवसभरात 688 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 498 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील 1 व्यक्ती पुण्याबाहेरील आहे.
पुण्यात सध्या 278 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,37,096 इतकी आहे. तर पुण्यात 5091 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4864 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,93,841 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6124 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या –
राठोडांनी पाच कोटी दिल्याचा आरोप केल्यावर लहू चव्हाणांनी शांता राठोडांविरोधात उचललं मोठं पाऊल
‘शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका’, कंगणानं उचललं हे मोठं पाऊल
‘कोहली’ने केला होता तब्बल 2 लाखांचा दारूसाठा, पोलिसांनी धाड टाकल्यावर पितळ पडलं उघडं!
फुलराणीच्या भूमिकेत दिसणार बॉलिवुडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या!
Comments are closed.