बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

पुणे | पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 406 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 415 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील 2 व्यक्ती पुण्याबाहेरील होत्या.

पुण्यात सध्या 262 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,31,008 इतकी आहे. तर पुण्यात 4906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4859 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,93,343 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 4815 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली”

“इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”

‘मुंबईतील त्या दिवशीच्या ‘बत्तीगुल’मागे चीनचा हात?’; ऊर्जा मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

देशातील ‘या’ 6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलचा थरार

दम लगा के हैशा! मेरोलिनच्या पुशअप्स चॅलेंजवर राहुल गांधींचा दस का दम, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More