बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुबंई | गेल्या काही दिवसांपासून पाऊस चांगलाच बॅटिंग करत आहे. सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार (heavy) पावसाने अनेक जिल्ह्यातील रहिवाशांचे नुकसान झाले आहे. त्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

येत्या तीन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. पुढील तीन दिवस पाऊस पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढेल असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. त्यामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

परतीचा पाऊस आणखी जोरदार असणार आहे. मुंबई, पुणे (Pune) रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग भागात जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यालाही ऑरेज अर्लट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, रायगडमध्ये शनिवारपर्यंत तुरळक पावसाची शक्यता आहे. मान्सून पुढील तीन-चार दिवस सक्रिय राहणार आहे. ही माहिती हवानान तज्ज्ञ के. एस. होशाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.

थोडक्यात बातम्या 

“गद्दारी करणारे परत निवडून येणार नाहीत”

Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणाला नवं वळण, प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More