बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

जयपूर |  देशभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. लसीकरणाला गती आल्याचं पाहायला मिळतंय. देशात आतापर्यंत 30 टक्के लसीकरण पुर्ण झालंय. मात्र अजूनही काही ठिकाणी लसीकरणाबाबत जागरूकता नसल्याचं पाहायला मिळतंय. राजस्थानमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

राजस्थानमधील अजमेर पिसांगन पंचायत समितीच्या नागेलाव गावात काही ग्रामस्थांचं लसीकरण झालेलं नाही. आरोग्य अधिकारी घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत. यादरम्यान एका महिलेच्या घरी आरोग्य अधिकारी गेले असता त्या महिलेनं जोरदार गोंधळ घातला.

संबंधित महिलेनं सुरुवातीला लसीकरणासाठी नकार दिला. सरकारचा आदेश असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी महिलेला सांगितलं. यावरुन त्या महिलेनं अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावरच न थांबता तिनं घरात जाऊन एक टोपली आणली. टोपलीचं झाकण उघडत तिनं कर्मचाऱ्यांना अंगावर साप सोडण्याची धमकी दिली. तरीदेखील आरोग्य अधिकारी महिलेला समजावत राहीले. अखेर ती लस घेण्यास तयार झाली. महिलेबरोबरच तिच्या सर्व कुटुंबीयांनी देखील लस घेतली.

देशात आतापर्यंत 95 कोटींहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. तसेच मिशन कवच कुंडल अंतर्गत नुकतेच पुण्यातील मुळशी तालुक्यात 100 टक्के लसीकरण पुर्ण झालं आहे. सुरूवातीला कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल असलेला गैरसमज आता हळूहळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच राजस्थानमधील लसीकरणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आलेल्या अनूभवावरून आरोग्य कर्मचारी कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

‘या’ कारणामुळे भारतीय हवाई हद्दीत घुसलं शेजारील देशाचं विमान

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More