बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | पुढील तीन-चार दिवसांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाहूयात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कशी असेल पावसाची स्थिती.

आज आणि पुढील तीन दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्रात जुलैला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर!

जयंत पाटलांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती!

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More