Top News आरोग्य

सावधान ! ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर

Photo Credit- Pixabay

आपल्या रोजच्या काही सवयींमुळे अकाली म्हातारे दिसायला लागतो. कारण आपली जीवनशैली आपल्या शरीरस्वास्थ्यावर खूप परिणामकारक ठरत असते. तर दिनचर्येतील अशा कुठल्या सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणे अवेळी दिसायला लागतील. ती दिसू नयेत यासाठी कुठल्या सवयी आजच थांबवणं आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

स्ट्रॉने पेय पिणे : जेव्हा आपण स्ट्रॉचा वापर करुन कुठलेही पेय पितो तेव्हा ओठांच्या चारही बाजु ताणल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर प्रीमेच्योर लाइन्स म्हणजेच सुरकुत्या दिसायला सुरवात होते. त्यामुळे स्ट्रॉचा वापर टाळून पेय पिण्यासाठी ग्लास किंवा कपाचा वापर करावा.

जंक फूड आणि कोल्डड्रिंक : जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट असते. त्याचबरोबर यामध्ये मीठाचे आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. जंक फूड शरीरातील कोलेजन घटकाची मात्रा कमी करते. त्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडायला सुरवात होते. जंक फूड आणि कोल्डड्रिंकसारख्या पदार्थांमध्ये पोषकतत्वे अजिबात नसल्यामुळे चेहऱ्यावर फाइन लाइन्स दिसायला सुरूवात होते. 

दारुचे अतिसेवन : तज्ञांच्या मते जी लोकं दारुचे अतिसेवन करतात ती लवकर म्हातारी दिसायला लागतात. दारुच्या अतिसेवनाने डोळ्यांखाली काळे डाग पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, बाॅडी डिहाइड्रेट होणे ही लक्षणं दिसायला लागतात. 

पोटावर झोपणे : झोप शरीरासाठी सगळ्यात आवश्यक घटक आहे. पुर्ण झोप शरीराला ऊर्जा देते पण एस्थेटिक सर्जरी जर्नल च्या अभ्यासानुसार जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर त्वरीत सावध व्हा. पोटावर झोपणाऱ्या लोकांमध्ये म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसतात. जेव्हा तुम्ही पोटावर झोपतात तेव्हा दबाव सरळ चेहऱ्यावर पडतो आणि लवकर सुरकुत्या पडायला सुरवात होते. त्यामुळे आजच तुमच्या झोपायची पद्धत बदला.

दरम्यान, या सर्व सवयी टाळाच पण त्यासोबत पोष्टिक आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात आमलात आणा. त्यामुळे निरोगी आणि सुखी आयुष्य जगाल.

थोडक्यात बातम्या

“पवारांसारख्या भ्रष्ट राजकारण्याच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण नको”

भाजप-मनसे युती होणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

साताऱ्यात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

विधानसभा अध्यक्षपद पुण्याला मिळणार?; ‘या’ नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या