मुंबई | दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक अशा सवयी असतात ज्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होत असतो. काही चूकीच्या सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. सकाळी झोपेतून उठताच अनेकांना अशा काही सवयी असतात ज्यामुळे आरोग्य तर बिघडतेच शिवाय संपूर्ण दिवसही खराब जातो.
झोपेतून उठताच अनेकांना फोन वापरण्याची सवय असते. या सवयीमुळे डोळे खराब होतात. झोपेतून उठताच फोन वापरला की दिवसाचं ठरवलेलं नियोजन बिघडतं. त्यामुळे सकाळी उठताच आधी दिवसाचं नियोजन करा, ताज्या हवेत श्वास घ्या, यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.
सकाळी नाश्ता न करणे ही अनेकांची अत्यंत वाईट सवय आहे. फक्त चहा पिऊन किंवा उपाशी पोटी कामाला लागलात तर तब्येतीवर अनेक विपरीत परिणाम होतात. चांगल्या आरोग्यासाठी सकाळी वेळेवर पौष्टिक नाश्ता करणं खूप महत्वाचं आहे.
कित्येकजण सकाळी झोपेतून उठताच आयुष्यातील नकारात्मक गोष्टींचा विचार करतात यामुळे दिवस खराब जातो. शिवाय अनेकांना आंघोळ न करता घराबाहेर पडण्याची सवय असते. या सवयीमुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. दिवस चांगला जावा व आरोग्य निरोगी रहावं वाटत असेल तर वेळीच या सवयी बदलल्या पाहिजेत.
थोडक्यात बातम्या-
भाजप-सेनेची युती होणार?, ‘या’ भेटीमुळे चर्चांना उधाण
“…त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पडणार, दिवा विझण्यापुर्वी फडफडतो”
सुप्रिया सुळेंना सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, 11 पैकी 4 महाराष्ट्राचे खासदार
आर्यन खानची लवकरच होणार बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; अॅक्टींग नाही तर ‘हे’ काम करणार
“…तर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”
Comments are closed.