इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी खराब होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी

मुंबई | अलीकडं पेट्रोल- डिझेलच्या(Petrol -Diesel)दरात होत असलेल्या वाढीमुळं अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत . त्यामुळं इलेक्ट्रिक गाड्यांचं(Electric Vehicle)प्रमाण वाढलं आहे.

जर तुमच्याकडंही इलेक्ट्रिक गाडी असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. कारण इलेक्ट्रिक गाड्यांची बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते.पण जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या गाडीची बॅटरीही(Vehicle Battery)जास्त काळ चांगली राहू शकते.

शक्य असेल तर गाडी सर्व्हिसिंग करताना गाडीतील बॅटरी काढून ठेवावी. कारण जर बॅटरीत पाणी गेले तर बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं बॅटरीत पाणी जाऊ नये, याची काळजी घ्यावी.

गाडी पार्क करतानाही काही गोष्टींची काळजी घ्यावी. जसं की मोटारसायकल पार्क करताना नेहमी कोरड्या आणि थंड जागेत पार्क करावी. त्यामुळं गाडीला कोणतंही नुकसान होणार नाही.

गाडी सर्व्हिसिंग करताना अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरमध्येच जावे. तसेच गाडीतील इलेक्ट्रिकल लाईन्स आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन सतत स्वच्छ करणंही तितकंच गरजेचं आहे.

दरम्यान, जर तुम्ही जास्त वेळासाठी कुठं जात असाल तर तुमच्या गाडीचा MCB बंद करणं आवश्यक आहे. म्हणजे पुन्हा गाडी चालू करताना काही समस्या येणार नाही.

महत्वाच्या बातम्या-