Top News महाराष्ट्र मुंबई

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता अहवाल वाचू लागले आहेत, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही, असंही भातखळकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि 110 कोटींची वांगी किती काळ चालणार?, अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप

ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”

नवरीसारखा श्रृंगार करत आपल्या पोटच्या मुलांसोबत महिलेने केलं धक्कादायक कृत्य!

“राज्यातील दोन दिवसाचं अधिवेशन आठवं आश्चर्य तर केंद्राने रद्द केलेलं अधिवेशन हे कितवं आश्चर्य”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या