बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | मंकीपॉक्सचे(Monkeypox) रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी दिल्लीत आणि काल तेलंगणात मंकीपॉक्सचा संशयित व्यक्ती आढळून आल्याने सध्या भारतात खळबळ उडाली आहे. हे वाढते रूग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने सर्वांना काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे. रोगप्रतिकारशक्ती(Immunity) कमी असल्याने मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता जास्त असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने गर्भवती महिला आणि लहान मुलांना मंकीपॉक्सचा जास्त धोका  आहे, असं आरोग्य मार्गदर्शकांनी सांगितलं आहे.

काँगोमध्ये एक संशोधन करण्यात आलं आहे. त्यामध्ये गर्भवती महिलांना मंकीपॉक्सचा जास्त धोका आहे हे दिसून आलं आहे. या संशोधनात 216 महिलांचा समावेश होता, त्यातील 5 पैकी 4 महिलांचा गर्भपात झाला. तसेच अनेकींच्या पोटातील मुलांनाही मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. त्यामुळे गर्भवती महिलांनी विषेश काळजी घ्यावी, असे आरोग्य़ मार्गदर्शक सांगत आहेत. तसेच आता प्रत्येक  देशातील आरोग्य विभागाने(Health Department) सतर्क राहावं, असं जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) सांगितलं आहे.

गर्भवती महिला( Pregnant women) चांगला आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. तुम्ही रोज ताजी फळे आणि ताज्या भाज्या खाऊ शकता. तसेच रोज हळदीचे दूध प्या. योग्य आहार घेतल्याने तुमचे इतर आजारांपासून देखील संरक्षण होते. मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीपासून दूर रहावे. तसेच टुथब्रश, टॉवेल इतरांचं वापरू नका.

तसेच सर्वांनीच पोैष्टिक अन्न खायला हवं. तुम्ही आहारात लिंबाचा आणि इतर आंबट पदार्थांचा वापर करावा. जेवणात पुदिन्याचा वापर करून देखील तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच तुम्ही तुळशीची पानेही खाऊ शकता. आयुर्वेदात तुळशीच्या पानांचे महत्व अधिक आहे. रोज एक सफरचंद खावे. योग्य आहार घेतल्याने तुमचा मंकीपॉक्सपासून बचाव होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

जितेंद्र आव्हाडांची बाबासाहेब पुरंदरेंवर टीका, म्हणाले…

राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो?, वाचा सविस्तर

अविवाहितेच्या मुलांना फक्त आईचं नावही लावता येणार, ‘या’ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘या’ आर्युवेदिक उपायाने झटपट वजन कमी करा, वाचा सविस्तर

कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, बाळाचं नावंही आहे अगदी खास; पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More