Watermelon l सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, बाजारात रसाळ फळे विक्रीसाठी येत आहेत. कलिंगड (Watermelon), संत्री, द्राक्षे यांसारखी फळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. कलिंगडामध्ये (Watermelon) पाण्याचे प्रमाण अधिक (सुमारे ९२ टक्के) असल्याने उन्हाळ्यात ते ‘सुपरफूड’ ठरते. अनेक विक्रेते कलिंगड कापून ठेवतात आणि ते लालभडक दिसत असल्याने ग्राहक आकर्षित होतात. मात्र, अशा कलिंगडामध्ये (Watermelon) रसायनांचा वापर केलेला असू शकतो, ज्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
लालेलाल दिसण्यासाठी रसायनांचा वापर :
सध्या बाजारात कलिंगड २० रुपये किलो दराने विकले जात आहे. उन्हाळ्यात कलिंगडाचा पुरवठा अधिक होतो, त्यामुळे त्याचे भाव वाढतात. लालभडक दिसणाऱ्या कलिंगडामध्ये (Watermelon) सोडियम सॅक्रिन (sodium saccharin) आणि सिंथेटिक रंगाचा (Synthetic color) वापर केला जातो. अशा फळांमुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कलिंगड खरेदी करताना काळजी घ्यावी.
कलिंगड पिकवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा (oxytocin injections) वापर केला जातो. या इंजेक्शनवर (injection) सरकारने बंदी घातली आहे. अशा फळांमुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो. भेसळ आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केली जाते.
Watermelon l बिया कोवळ्या निघाल्यास फसवणूक :
कच्चे कलिंगड (Watermelon) लाल करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. कापल्यानंतर त्याच्या बिया कोवळ्या निघाल्यास ते नैसर्गिकरीत्या पिकलेले नाही, हे लक्षात घ्यावे.
कलिंगड (Watermelon) खाण्यापूर्वी १५ मिनिटे पाण्यात ठेवावे, म्हणजे त्यातील रसायने निघून जातील. कलिंगडाच्या फोडीचा रंग पाण्यात विरघळल्यास त्यात रसायन असल्याचे स्पष्ट होते.