बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! दिवाळीची ऑनलाईन शाॅपिंग करताय? मग घ्या ‘ही’ खबरदारी

मुंबई | देशात दिवसेंदिवस सायबर क्राईमचं प्रमाण वाढत आहे. अशातच आता दिवाळी तोंडावर आली आहे. यादरम्यान, नागरीक मोठ्या प्रमाणात कपडे, पणत्या, दिवाळी साठी खरेदी करतात. ही खरेदीची रक्कम अनेक लोक ऑनलाईन बँकिंग म्हणजेच क्रेडीट कार्ड नाहीतर डेबीट कार्डचा वापर करतात. मात्र अशा वेळी लोकांनी सावधान राहणं गरजेचं आहे. कारण दिवाळीच्या सणात सायबर ठग फसवणुकीसाठी तयार आहेत.

केवळ ऑनलाईन विक्रेत्यांकडून खरेदी करु नका. विशेषतः जे लोक गिफ्ट कार्ड, मनी ट्रान्सफर नाहीतर क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे घेतात. तसेच ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर आणि इतर वेळेस कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करु नका. कोणत्याही नवीन वेबसाईटवरुन खरेदी करण्यापुर्वी त्या वेबसाईटची पुरेपुर माहिती गोळा करा. त्यानंतर मालाचे वर्णन काळजीपूर्व वाचा. तसेच जास्त मोठ्या प्रमाणात ऑफर असेल तर सावध व्हा ती बनावट असू शकते.

खरेदी केल्यानंतर मोबाईल नंबरवर लाॅटरी जिंकल्याचे मेसेज आल्यानंतर भांबावून जाऊ नका. अशा लिंक्स देखील फ्राॅड असू शकतात. काही महिन्यांपुर्वी एनसीबीने देखील सायबर क्राईम पासून वाचण्याचे मार्ग सांगितले होते. त्यानुसार लास्ट लॉगइन डेट आणि वेळ तपासून इंटरनेट बँकिंग पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. तसेच पब्लिक वायफाय, फ्री वायफाय, सायबर कॅफे आणि इतरांशी शेअर होणाऱ्या पीसीवरुन इंटरनेट बँकिंगचा वापर करू नका. कधीही खासगी माहिती बँक साईटवर अपडेट केल्यावर रिवॉर्ड देण्याचा दावा करणाऱ्या ईमेल, एसएमएस आणि फोन कॉलपासून सावध राहा.

दरम्यान, फ्रॉड झाल्यापासून 24 तास झाले असतील, तर पीडित नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. कोरोना काळात अनेक राज्यांमध्ये हनीट्रॅप रचून व्हीडीओ काॅल तसेच व्हाॅट्सअॅप ग्रुपद्वारे देखील अनेक साईबर क्राईम झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

“इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली?”

‘हिंमत असेल तर त्यांनी दावा ठोकावा’, नवाब मलिकांचं समीर वानखेडेंना खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More