बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ लक्षणं दिसताच व्हा सावध ‘हा’ फंगस फुफ्फुसांपर्यंत पोहोचत तयार करतोय लंग बॉल

मुंबई | कोरोनासोबत बुरशीजन्य आजारांनी लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. यामध्ये ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस, यलो फंगस आणि क्रीम फंगसचा समावेश आहे. या सर्वात ब्लॅक फंगसला सर्वात धोकादायक श्रेणीत समाविष्ट करण्यात आलं आहे. काही विशेषज्ञांच्या मते व्हाईट फंगस देखील धोकादायक आहे. या फंगसचा संसर्ग झाल्यास तो सर्व अवयवांवर परिणाम करु शकतो.

विशेषज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट फंगसला वैद्यकीय भाषेत कॅंडिडा असं म्हणतात. याचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसांसोबतच रक्त वाहिन्यांवरही परिणाम होतो. रुग्णाच्या रक्तात फंगसचा प्रवेश झाल्यावर त्यास कॅंडिडीमिया असं म्हणलं जातं आणि येथूनच तो धोकादायक होण्यास सुरुवात होते. एस.एन. मेडिकल कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. आरती अग्रवाल यांनी सांगितलं की, जर कॅंडिडीमिया फुफ्फुसांपर्यंत पोहोचला तर त्याला लंग बॉल असं म्हणलं जातं. सीटी स्कॅनद्वारे तपासणी केल्यानंतर हा फुफ्फुसांमध्ये गोल आकारात अस्तित्वात असल्याचं दिसतं. कोरोनामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो, तसाच परिणाम व्हाईट फंगसमुळे होत असल्यानं रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

हे फंगस साधारणपणे कमी प्रमाणात आढळतात. सुरुवातीलाच याबाबत निदान झालं तर फार नुकसान होत नाही. पण जर उपचारांना उशीर झाला तर हे फंगस जीवावर बेतू शकते. हा फंगस शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करु शकतो. त्यामुळे वेळीच याचा संसर्ग आटोक्यात आणला नाही तर अवयव निकामी होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.  रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले मधुमेही रुग्ण आणि दिर्घकाळ स्टेरॉईड घेत असलेल्या रुग्णांना याचा जास्त धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या तोंडात दह्यासारख्या पांढऱ्या पदार्थासारखा थर दिसून येतो.

दरम्यान, संसर्ग होण्यापूर्वी 1 ते 2 आठवडे अगोदर त्वचेवर लहान आणि वेदनाविरहीत गोल फोड येतात. व्हाईट फंगस जर फुफ्फुसामध्ये पोहोचला तर खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे आणि ताप येऊ शकतो. संसर्ग पायांपर्यंत पोहोचला तर आर्थरायटीसप्रमाणे वेदना सुरु होतात आणि रुग्णास चालताना त्रास होऊ लागतो. मेंदुपर्यंत संसर्ग पोहोचला तर विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसच डोकेदुखी सुरु होऊन चक्कर येऊ लागते. त्यामुळं अशी लक्षणं दिसताच तात्काळ डॉक्टरांना दाखवा.

थोडक्यात बातम्या –

15 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले ‘या’ तरूणीचे तांडव नृत्य; पाहा अंगावर रोमांच आणणारा व्हिडीओ

“चंद्रकांत पाटील आपल्या मतावर ठाम नसतात, त्यांची मतं रोज बदलतात”

अजब प्रकार! कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या वस्तू अन्…..

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

देशात एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद; नव्या बाधितांची संख्या 1 लाखांच्या आत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More