एटीएममधून पैसे काढताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर पैसे एटीएममध्येच अडकू शकतात

मुंबई | एटीएम कार्ड(ATM Card) आल्यापासून पैसे काढणं सोप झालं आहे. पैसे काढण्यासाठी आता बॅंकेत(Bank) रांगेत उभे राहण्याची जास्त गरज भासत नाही. अगदी एका मिनिटात आपण एटीएममधून पैसे काढू शकतो.

एटीएमच्या वाढत्या वापराबरोबरच फसवणुकीचे प्रमाणदेखील वाढत आहे. तसेच काही वेळा आपल्या चुकीमुळं देखील पैसे एटीएममध्ये अडकतात. आता आपण एटीएममध्ये पैसे अडकण्याची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत, याची माहिती घेऊयात.

एटीएममधून पैसे काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता काही एटीएम मशिनमध्ये पीन वगैरे टाकण्याची प्रोसेस झाली की लगेच कार्ड काढून घ्यावं लागतं. तर काही एटीएम मशिनमध्ये पैसे आल्यानंतर कार्ड काढता येते. अशावेळी पैसे काढताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेन.

यासाठी तुम्हाला त्या एटीएमची पद्धत समजून घ्यावी लागेन. जर एटीएम मशिनची पद्धत अशी असेन की, एटीएमनं पैसे मोजायला सुरूवात केल्यानंतर एटीएम कार्ड काढून घ्यावे लागत असेल. तर अशावेळी तुम्ही एटीएम कार्ड काढले नाही तर तुमचे पैसे एटीएममध्येच अडकू शकतात.

जर तुमचे पैसे एटीएममध्ये अडकले आणि पैसे कट झाल्याचा मेसेजही आला तर यात टेंन्शन घेण्यासारखं काही नाही. थोड्यावेळात ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. जर पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही बॅंकेत तक्रार करू शकता.

एकंदरीत एटीएममध्ये पैसे अडकू नयेत, यासाठी एटीएम मशिनची पद्धत समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-