बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस

मु्ंबई | एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार पडलं. त्यानंतर शिंदेे गटाने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केलं. शिंदे यांच्या इच्छेप्रमाणे आता भाजप-शिवसेना सरकार आलं. सुरुवातीला या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील असं सर्वांना वाटलं. तसेच अगदी मुख्यमंत्री पदाची घोषणा होण्यापूर्वी तासभर एकनाथ शिंदे यांना देखील माहित नव्हतं की ते मुख्यमंत्री होणार आहेत. पण फडणवीसांनी घोषणा केली आणि थोड्यावेळानंतर शपथविधी देखील झाला. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर फडणवीस ताबडतोब कामाला लागले. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी ते मंत्रालयात रुजू झाले आणि आरे कारशेड, जलयुक्त शिवार योजना, ओबीसी आरक्षण आदी प्रश्नांवर त्यांनी संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांना या प्रश्नांवर काहीही करुन काम करण्याचे आणि प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.

2024 मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश सुद्धा फडणवीसांनी भाजप नेते कार्यकर्त्यांना दिलेत. राज्यात आपलं सरकार आलं असून कोणीही नाराज होऊ नका. सर्वांची कामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना आणि आमदारांना दिला.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत फडणवीसांनी हे आदेश दिले. पुढच्या अडीच वर्षात रखडलेली सर्व कामे मार्गी लावू. कोणीही कसलीही काळजी करु नका आणि आता सर्वांनी जनतेच्या कामासाठी लागा, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”

उपमुख्यमंत्री होताच फडणवीस अ‌ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी 24 तास उपलब्ध- एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी

‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More