देश

चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सज्ज रहा- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडू शकतात. ही आपल्यासाठी संधी आहे. राज्यांनी ही गुंतवणूक आपल्याक़डे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. करोना व्हायरसची सध्याची स्थिती, लॉकडाउन या मुद्दांबरोबरच चिनी गुंतवणूकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मोदी बोलत होते.

चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांनी सज्ज रहावं. पुरेसे कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयी-सुविधामुळे भारतामध्ये चीनला पर्याय ठरण्याची क्षमता आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे अनेक कंपन्या चीनच्या पलीकडे पर्याय शोधत आहेत. ही गुंतवणूक राज्यांमध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून व्यापक रणनितीवर एकत्र काम केले पाहिजे, असं मोदी मुख्यमंत्र्यांना म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

“माझ्याकडे सगळी माहिती, पण…”;किम जोंग यांच्या प्रकृतीवर ट्रम्प यांचा खुलासा

वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या